शिवसेनेने दहा रुपयात जेवण देण्याची घोषणा केली आहे ती कर्नाटकातील इंदिरा कॅन्टीनची कॉपी आहे.
सिद्धरामय्या यांनी इंदिरा कॅन्टीन योजना सुरू केली.यामध्ये एक रुपयात नाश्ता आणि दहा रुपयात जेवण इंदिरा कॅन्टीनमध्ये दिले जाते.इंदिरा कॅन्टीनला कर्नाटक सरकारकडून अनुदान दिले जात होते.
आता याच धर्तीवर शिवसेनेने महाराष्ट्रात दहा रुपयात भोजन ही योजना सुरू करण्याचा निश्चय केला आहे.तसेच शिवसेनेने एक रुपयात आरोग्य तपासणी करण्याची योजनाही आखली आहे.यामध्ये केस पेपर करणे आदी खर्च समाविष्ट आहे.इंदिरा कॅन्टीन योजना कर्नाटकात खूप लोकप्रिय झाली होती विशेषतः बंगळुरू मध्ये या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला होता.
सिद्धमरामय्या सरकारने सुरू केलेली इंदिरा कॅन्टीन योजनेला आता भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे पूर्वी इतकी मदत मिळत नाही.त्यामुळे अनेक ठिकाणी इंदिरा कॅन्टीन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.आता शिवसेना महाराष्ट्रात दहा रुपयात भोजन ही योजना कशी कार्यान्वित करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ज्या प्रमाणे इंदिरा कॅन्टीन योजना बंगळुरू मध्ये यशस्वी झाली होती त्याच धर्तीवर शिकसेनेची दहा रुपयांत जेवण देणारी योजना मुंबईत यशस्वी होईल का हे पाहणे गरजेचे आहे.