Saturday, January 4, 2025

/

अनाथ प्राण्यांचे नाथ

 belgaum

रस्त्याच्या कडेला वेदनेने तळमळत असलेल्या जखमी कुत्र्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोन दिवस यातना सहन करायला लागलेल्या कुत्र्याला शेवटी प्राणिप्रेमींनी तेथून उचलून त्याला जीवनदान दिले.
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडच्या शेजारी वाढलेल्या गवतात एक जखमी कुत्रे वेदनेने विव्हळत पडले होते.तेथून जा ये करणारे कुत्र्याचा केविलवाणा आवाज ऐकायचे पण तसेच निघून जायचे.कोणालाही त्या कुत्र्याला तेथून काढून उपचार करावे असे वाटले नाही.शेवटी बावा अर्थात बेळगाव अँनिमल वेलफेअर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी त्याला जीवनदान दिले

जखमी झालेल्या, आजारी पडलेल्या बेवारस कुत्र्या,मांजरावर उपचार करून त्यांना जीवनदान देण्याचे कार्य बेळगाव अँनिमल वेलफेअर असोसिएशन करत आहे.
वेदनेने विव्हळत असलेल्या कुत्र्याला पहिलेंदा दोन तरुणांनी तेथे जागेवरच प्रथमोपचार दिले.नंतर तेथे बघ्यांची गर्दी जमली.त्या बघ्यापैकी काही जणांना त्या कुत्र्याला घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यास मदत करा म्हणून त्या तरुणांनी सांगितल्यावर बघ्यांची गर्दी आपोआपच पांगली.वरुण कारखानीस आणि अमित चिवटे या बावाच्या संचालकांनी प्रयत्न करून कुत्र्याला नेण्यासाठी वाहन मिळवले.

Bawa
Bawa

प्रत्येक दिवशी दोन बेवारस कुत्र्यांना बावा तर्फे जीवनदान दिले जाते.शहरातील गल्ल्यात बेवारस जखमी कुत्रे आणि मांजरे यांच्याकडे सगळे दुर्लक्ष करतात म्हणून हाल होऊन त्या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो.बावाच्या कार्यकर्त्यांना जखमी प्राण्याची माहिती मिळाली की ते लगेच तेथे पोचून कुत्रा किंवा मांजराला लगेच उपचार मिळवून देतात.चिवटे आणि कारखानीस यांच्या बरोबर अभिजित सामंतही असतो.हे तिघे बावाचे संचालक असून त्यांचा मित्रपरिवार देखील त्यांना मदत करत असतो.

चिवटे यांनी सांगितले की एका प्राण्याला उचलून वाहनातून नेणे,उपचार करणे आणि त्याची राहण्याची सोय करणे याला सातशे रुपये खर्च येतो.उपचार केलेल्या प्राण्यांना ठेवण्यासाठी जागेची समस्या भेडसावत आहे.
प्राण्यांना नेण्यासाठी स्वतःची वाहतूक व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात ही मंडळी आहेत. सध्या उपचार करून बरी झालेली सहा कुत्री शेडमध्ये आहेत.या प्राण्यांना कोणी दत्तक घेत असेल तर त्यांना देण्यात येणार आहे.संघटनेला मदत करण्यासाठी समाजातील व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन या तरुणांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.