पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यात येणार आहे.प्रशिक्षणासाठी अमेरिका,स्कॉटलंड,पोलंड आदी देशात पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्या संबंधी चर्चा सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
हिरेबागेवाडी येथे पोलीस वसतीगृह उदघाटन प्रसंगी बोलत होते.
नवीन तंत्रज्ञान प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने आत्मसात करणे आवश्यक आहे.गुन्ह्याचे स्वरूप बदलत चालल्यामुळे नवीन तंत्रज्ञान पोलिसांना अवगत असणे गरजेचे आहेअसें ते म्हणाले.
आगामी वर्षात सोळा हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे.एक हजार पोलीस उप निरीक्षकांची देखील भरती करण्यात येणार असल्याची माहिती बोम्माई यांनी दिली.यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी,लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.