शुक्रवारी शेतकऱ्यांनी आक्रमक होत सुरू असलेले हालगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा एकदा रोखत आंदोलन केले.
बेळगामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या तिबारपीकी सुपीक जमीन बेकायदेशीरपणे भूसंपादन करुन केंद्र,राज्य शासन विकासाचे गाजर दाखवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते पोलीसी बळाची दहशत दाखवत हालगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सूरु केले असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
याप्रकरणी शेतकऱ्यांचे आंदोलन पायदळी तुडवत,उच्च न्यायालयात पन्नास शेतकऱ्यांनी जून 2019 मध्ये दावा दाखल करुनही शेतकरी आता सुगीच्या कामात मग्न असलेले पाहून बायपासचे काम युध्दपातळीवर सूरु होते ते आज शुक्रवारी संबधीत पट्यातील व इतर शेतकऱ्यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या खंबीर पाठिंब्याने मच्छे गावापासून सूरु झाले होते ते काम शेतकऱ्यांच्या प्रखर आंदोलनाने बंद करुन सर्व मशीनी तसेच कर्मचाऱ्यांना परत पाठवले.
सदर बायपास कसा बेकायदेशीर आहे याची समग्र माहिती दिल्यावर तहशिलदारनां ते पटल्यावर शेतकऱ्यांना पटतील असे पुरावे सादर करा व त्यांच्या सहमतीशिवाय कोणतेच पाऊल उचलू नका म्हणून महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सांगीतल्यावर मशीनीसह पोलीस फौजफाटा परत पाठवला.
जर हा बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द झाला नाही तर कर्नाटक राज्य रयत संघटना बायपासवर मोठं आंदोलन करत संपूर्ण राज्यात उग्र आंदोलन केल्याशिवाय रहाणार नाही असे बेळगाव जिल्हा रयत संघटना अध्यक्ष सत्याप्पा मल्लापूर यांनी राज्य शासनाला इशारा दिला.