गणपत गल्लीतील फेरीवाल्यांची मुजोरी
वाढली असून तेथील वाहतूक कोंडी आणि जनतेला होणाऱ्या गैरसोयीला तेच जबाबदार आहेत.
गणपत गल्लीत फेरीवाल्यानी सगळा रस्ता व्यापून टाकलाय त्यामुळे खरेदीसाठी गेलेल्या जनतेला फेरीवाल्यांचे धक्के,कर्कश आवाज ऐकत दुकानात जावे लागते.अनेक दुकानात या फेरीवाल्यामुळे ग्राहकांना रस्ता शोधत जावे लागते.
फेरीवाल्यामुळे दुकान ग्राहकांना दिसत नाही आणि त्यामुळे दुकानदारांना गिऱ्हाईक कमी झाले आहे.ग्राहक कमी आल्यामुळे भाडे भरणे देखील काहींना मुश्किल झाले आहे.रस्त्यात आडव्या तिडव्या गाड्या लावणे,ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्याने ओरडणे या साऱ्या बाबीचा जनतेला त्रास होत आहे.
ग्राहकांवर दादागिरी करणे,खराब फळे पदरात घालणे,एखाद्याने तक्रार केली तर सगळे मिळून अंगावर जाणे असे प्रकार नेहमी घडत आहेत.पोलीस देखील यांच्याकडे दुर्लक्ष करतात,पोलीस का त्यांना सहानुभूती दाखवतात हे सगळे गौडबंगाल आहे.