जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीर मरण प्राप्त झालेल्या जवान राहुल भैरू सुळगेकर याच्यावर शोकाकुल वातावरणात साश्रु नयनांनी उचगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राहुलच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.राहुलच्या घरच्यांचा हंबरडा पाहून मित्रांचे देखील डोळे पाणावलेले चित्र होते.
गावातील सगळे व्यवहार दोन दिवस ग्रामस्थांनी बंद ठेवले होते. ग्रामस्थांनी यावेळी राहुल सुळगेकर अमर रहेच्या घोषणा उपस्थितांनी दिल्या.फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनातून राहुल याची अंत्ययात्रा काढण्यात आली.अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.लष्करी इतमामात राहुलच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.जवानांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून राहुलला मानवंदना दिली.राहुलचे वडील भैरू सुळगेकर यांनी मुखाग्नी दिला.स्मशानभूमीत पालकमंत्री जगदीश शेट्टर,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,आमदार लक्ष्मी हेब्बाळकर,माजी आमदार संजय पाटील,जि पं सदस्या सरस्वती पाटील आदींनी शोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली.
राहुल याचे पार्थिव विशेष विमानाने दुपारी सव्वा एक वाजता बेळगावला सांबरा विमानतळावर आणण्यात आले तिथें मान वंदना देऊन पार्थिव मराठा सेंटरला नेण्यात आले. त्या नंतर उचगावं कडे रवाना झाले.गर्दी इतकी होती की हिंडलगा पासून मिरवणुकीने उचगावला पार्थिव नेण्यात आले.
रस्त्याच्या दुतर्फा हातात तिरंगा ध्वज घेऊन शेकडो तरुण थांबले होते.उचगावच्या रस्त्यावर तर जनसागरच लोटला होता.उचगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील शाळेत राहुलला स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली.उचगाव येथील राहुलच्या घराकडून निघालेल्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.राहुलचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनावर ठेवण्यात आले होते.अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यावर जल्लोष न करता जनतेने हजारोच्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होऊन देशाचे रक्षण करताना वीर मरण प्राप्त झालेल्या जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.
एकीकडे अयोध्या निकाल झाल्यावर जल्लोष न करता अवघा बेळगाव शहर आणि तालुका सीमेवर देश रक्षण करताना प्राणाची आहुती दिलेल्या राहुल याला अखेरचा निरोप देण्यासाठी एकवटले होते.उचगावचे रस्ते गर्दीने भरून गेले होते.
घर बांधायचे स्वप्न अपूर्ण
बुधवारी रात्री राहुल याने पुंछ मधून वडील भैरू यांना फोन केला होता त्यावेळी त्याच बोलणं शेवटचं ठरलं या शिवाय दिवाळीचा फराळ त्याचा साथीदार चंदगड तालुक्यातील राजगोळी येथील जवान घेऊन गेला होता फराळ
त्याला जम्मूला पोहोचायच्या आत त्याचे त्याचे पार्थिव उचगावला पोहोचले.राहुलचे 22 होते तो अविवाहित होता नवीन घर बांधून त्याचा विवाह करण्याचा बेत होता मात्र नवीन घर बांधण्याचे घरच्यांचे स्वप्न अर्धवट राहिले.