पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी गावोगावी फिरत असताना विविध पक्षाच्या नेत्यांना बेळगाव जिल्ह्यातील अथणी आणि कागवाड मतदारसंघात पूरग्रस्त जनता धारेवर धरत आहे.पुरग्रस्तांचा रुद्रावतार पाहून उमेदवार आणि कार्यकर्ते तेथून काढता पाय घेत आहेत.
अपात्र आमदाराविषयी देखील जनतेत नाराजी आणि संताप आहे.अथणी तालुक्यातील तेलसंग गावच्या जनतेने अथणी मतदार संघातील भाजप उमेदवार महेश कुमठळ्ळी यांना आपल्या गावात येण्यास बंदी घातली आहे.
ही शिवयोगीची भूमी आहे.येथे पैशासाठी विकल्या गेलेल्यांना प्रवेश नाही असे फलकावर लिहिण्यात आले आहे.त्यामुळे तेलसंग गावात भाजप उमेदवार महेश कुमठळ्ळी याना घालण्यात आलेली प्रवेश बंदी हा चर्चेचा विषय झाला आहे.
गेले कित्येक महिने महेश कुमटहळळी यांच्या सह काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केलेल्या आमदारांवर मतदार संघात दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता पोट निवडणूकीत तो राग व्यक्त झाला आहे.त्यामुळे निवडणुकीच्या निकालावर देखील याचा परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे.