महाराष्ट्रातील निवडणुका होऊन तब्बल पंधरा दिवस उलटले तरी अजूनही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरला नसल्याने गोंधळ उडाला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामधील कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. मात्र या मुख्यमंत्रीपदाच्या दावे दरासाठी बेळगावात मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागून राहिली आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचा दिलेला शब्द ते पाळत नसल्याने शिवसेना पेटून उठली आहे. तर ज्यांची संख्या जास्त आहे त्यांचाच मुख्यमंत्री होणार का फार्मूला भाजप नेते सेनेवर दबाव आणून टाकत आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग महापुराच्या संकटात असताना राज्यकर्ते मात्र सत्तेच्या खुर्चीसाठी धावपळ करताना दिसत आहेत.
तर दुसरीकडे पवार साहेब आपली खेळी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैलवानाचा नाहीत तर कुस्ती खेळावी कुणाबरोबर असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र महाराष्ट्राचे खरे कुस्तीगीर पवार साहेबच असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री कोणाचा होणार याची उत्सुकता मात्र सीमाभागात लागून राहिली आहे.
सीमाभागात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार यावे अशी आशा सीमावर्ती भागातून व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ही पूर्वीपासूनच सीमा प्रश्नाशी बांधील आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे शरद पवार हे सीमाप्रश्न पूर्वीपासून सीमावासियांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे सीमाभागात या दोन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाले तर परत एकदा दिवाळी साजरी होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे सरकार स्थापन करून सीमाभागावर होणारे अन्याय दूर करावे, अशीच मागणी सीमा भागातून होत आहे.