बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला असला तरी या अंतर्गत काढलेल्या कामामुळे मात्र निसर्गाचा राहत होत आहे. अनेक झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून पर्यावरणाचा समतोल दाखवण्यातच स्मार्ट सिटी योजनेतील अधिकारी धन्यता मानत आहेत का? असा सवाल उपस्थित करत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
व्हॅक्सिन डेपो मैदानातील 72 नमुन्याची झाडे तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. बेळगाव सिटीचा समावेश स्मार्ट सिटी झाला ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र या नावाखाली झाडांची होणारी कत्तल थांबवणे ही काळाची गरज आहे. याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असून स्मार्ट अधिकाऱ्यांना याबाबत ताकीद देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली व्हॅक्सीन डेपो मधील अनेक झाडांची कत्तल होत आहे. मात्र याकडे संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यावरच भर दिला आहे. अशा प्रकारांवर आळा घालून यापुढे होणाऱ्या निसर्गाचा ऱ्हास थांबवून निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याची दखल तातडीने घेऊन होणारे झाडांची कत्तल व निसर्गाचा ऱ्हास थांबवा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. भ्रष्टाचार निर्मूलन परिवर संघटनेचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, संजय पाटील, राहुल मिरजकर, अशोक पाटील, मोतिराम मोहिते, नारायण मोदगेकर, अविनाश वेलंगी, श्रीकांत कबाडी, सुरेंद्र कामते, राहुल शिंदे, सुभाष कांबळे आदी यावेळी उपस्थित होते