ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाल्याना पूर आला होता. ह्या पूरस्तीती मुळे शेतकऱ्यांना तसेच शहरी भागातील जनतेला मोठा फटका बसला होता.
सुळगा गावातून मार्कंडेय नदीला जोडणार केंबळी नाला वाहतो, ह्या नाल्यालाचे पाणी शेतवाडीत शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते .
ह्या नैसर्गिक आपत्ती बरोबर शेतकऱ्यांना हेस्कॉमचा दुर्लक्षाचा फटका बसला आहे. केंबळी नाल्या शेजारी हेस्कॉमनेे विद्युत तारेचे खांब उभे आहेत. पुराच्या प्रवाह मध्ये हे खांब कोसळले आहेत व विजेच्या तारा शेतवाडीत पडल्या आहेत.
या कोसळलेल्या विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होईल या भीतीने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावं लागत आहे. हेस्कॉमला वारंवार तक्रार देऊन सुद्धा दुरुस्ती करण्याचे हेस्कॉमने टाळले आहे.
कोणतीही घटना घडण्यापूर्वी ह्या खांबांची दुरुस्ती करण्याचे मागणी परिसरातील शेतकऱ्यांतुन होत आहे.या भागातील लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील केली जात आहे.