उप नोंदणी कार्यालयात होत असलेला मोठा भ्रष्टाचार अनेकांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. अशा परिस्थितीत गरीब नागरिकांना मात्र नोंदणी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. पैसे दिल्याशिवाय कोणताही व्यवहार होत नसल्याने अनेकांची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यातच कनिष्टअधिकार्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पैसे मोजावे लागत असल्याने कनिष्ठ अधिकारी चोर तर वरिष्ठ अधिकारी शिरजोर झाले आहेत.
एजंटांना पकडून अनेक कामे अधिकारीच करून घेत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. नुकतीच गहाळ झालेल्या कागदपत्रांवरून अनेकांना कारवाईच्या कचाट्यात अडकण्याची आले आहे. तर नऊ जणांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नऊ जणांच्या चौकशीनंतर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
उप नोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत उप नोंदणी कार्यालयाचा चाललेला मनमानी कारभार थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोणत्याही कामासाठी पैसे घेण्यातच तेथील अधिकारी धन्यता मानू लागले आहेत. या परिस्थितीत त्यांच्यावर कुणाचाही जराब बसून जिल्हाधिकाऱ्यांनी तरी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पैसे द्या आणि कामे करून घ्या अशीच या कार्यालयाची ओळख बनली आहे. कार्यालयात मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी असते. जागेची खरेदी व विक्री व्यवहार करण्यासाठी नागरिक येतात. मात्र पैसे मोजले नंतरच येथील कामे होत असल्याने अनेकांना जमिनीपेक्षा उप नोंदणी कार्यालयातील हेलपाटे अधिक लागत आहेत. त्यामुळे अनेक जण येथील कारभाराला कंटाळली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशीच मागणी होत आहे.