राष्ट्रीय घटना दिनानिमित्त विविध दलित संघटनांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला उत्तरचे आमदार अनिल बेनके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आमदार बेनके यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतात लोकशाहीची मूल्ये रुजली आहेत.घटनेद्वारे बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य माणसाला अनेक मूलभूत अधिकार मिळवून दिले आहेत.
आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया असे उदगार आमदार अनिल बेनके यांनी या प्रसंगी भाषण करताना काढले.मल्लेश चौगले यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.