या वर्षी आलेल्या महापुरामुळे अनेक पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हातातोंडाशी आलेल्या पिकाच्या सुगीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता लागून राहिली आहे.
या वर्षी पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे हालत गंभीर झाली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने अनेकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मळणी व भात कापणीचे काम जोमात सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेताच्या बांधावर दिसत आहेत. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे घाईगडबडीत शेतकरी गुंग झाल्याचे दिसून येत आहेत.
पुरामुळे अनेक पिके वाया गेली आहेत. जी पिके शिल्लक आहेत त्या पिकांच्या कापणीला तसा शेतकरी गुंतला आहे. सध्या शेतकरी सुखी हंगामात व्यग्र आहे. बासमती, इंद्रायणी, सोनम, शुभांगी या इतर जातीचे भात कापणीला जोरदार सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी शिवारात पाणी साचले असून ते काढून शेतकरी कापणी करत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून शेतातील पाणी बाहेर काढण्यात शेतकरी धडपड करत आहेत. मागील पंधरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी कामात व्यग्र झाले आहेत. मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जर आणखी काही दिवस असेच ढगाळ वातावरण असल्यास अनेक भीती निर्माण होणार आहे. त्यामुळे उघडी पडू दे रे बाबा अशी मागणी शेतकर्यांतून व्यक्त होत आहे.