स्मार्ट सिटी योजनेतील मंडोळी रोडचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.टिळकवाडी पोलिसांनी या कंत्राटदारावर कामात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
आय पी सी 304 ए अंतर्गत सदोष मनुष्यवध केल्याचा गुन्हा या स्मार्ट सिटीच्या ठेकेदारावर घालण्यात आला आहे.शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अयोध्या नगर येथील दौलत दवले गवळी यांचा सायकल वरून खड्यात पडल्याने खुले असलेले बार पोटात घुसून दुर्दैवी अंत झाला होता.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत मंडोळी रोड चा रस्ता बनवला जात आहे एका ठिकाणी खड्डा खुला असून लोखंडी बार खुले ठेवण्यात आले आहेत त्यामुळेया खड्ड्यात पडून दुर्दैवी अंत झाला होता त्यामुळे संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी माजी नगरसेवक पंढरी परब यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडी पोलीस स्थानका शेजारील स्मार्ट सिटी कार्यालया समोर आंदोलन केले घोषणाबाजी केली.मयताचा मृतदेह घरी ठेऊन जोरदार आंदोलन केले त्या नंतर टिळक वाडी पोलिसांनी धाव घेतं मृतदेहाची शल्य चिकित्सा करत ठेकेदारावर गुन्हा दाखल केला.
ठेकेदारा बरोबर स्मार्ट सिटी इंजिनिअर वर गुन्हा दाखल करा अशी मागणी वाढू लागली आहे.यावर पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागरिकांनी आंदोलन करून काम बंद पाडवले म्हणून काम थांबले आहे असे सांगून आपली कातडी बचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र जबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई हवी अशी मागणी वाढत आहे.