हॉस्पिटलमध्ये जोकरच्या वेषात तरुणी अवतरल्या आणि वातावरणच बदलून गेले. खुला आसमानतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी हे चित्र पाहायला मिळाले. शितल अगरवाल व खुशबू जैन यांनी मुलांच्या वॉर्डमध्ये जाऊन त्यांना हसविले.
हॉस्पिटलमध्ये सादर केल्या जाणाऱ्या या प्रकाराला हॉस्पिटल क्लाऊनिंग॔ असे म्हणतात. या मनोरंजनात्मक कार्यक्रमात मुलांसह पालक देखील दुःख विसरून हास्यात बुडाले होते. याप्रसंगी डॉक्टर मिलिंद हलगेकर, डॉक्टर सुरज जोशी, लता कित्तूर, गौरी गजरबर आदी उपस्थित होते.
स्वाती कुलकर्णी यांनी बेळगावात प्रथमच हा प्रयोग आणला आहे. खुशी व शीतल या दोघीही दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये हेच काम करतात. या प्रयोगामुळे सीव्हीलमधील रुग्ण मुले मनसोक्त हसली, आपली मुले काही काळ वेदना विसरल्याने पालक ही भरून पावले. त्याचप्रमाणे उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. असाच प्रयोग शुक्रवारी दुपारी के एल ई हॉस्पिटलमध्ये देखील सादर करण्यात आला.