आता बेळगावमध्ये दुचाकी वाहन भाड्याने मिळण्यास प्रारंभ झाला आहे.बाऊन्स या कंपनीने ही दुचाकी सेवा सुरू केली आहे.
त्यामुळे दुचाकी वाहन भाड्याने घेऊन तुम्हाला आता शहराची सैर करणे शक्य झाले आहे. या आपल्या नव्या सेवेची माहिती व्हावी म्हणून कंपनीने पहिली राईड मोफत देण्याची घोषणा केली आहे.
शंभर रुपये पर्यंत पहिली राईड असेल तर ती मोफत असणार आहे.पाच रुपये प्रति किलोमीटर आणि पन्नास पैसे एक मिनिटं या हिशोबाने भाडे आकारले जाणार आहे.ही सेवा केवळ बेळगाव शहराच्या हद्दीतच उपलब्ध राहील.
धर्मवीर संभाजी चौक,उद्यमबाग आणि अन्य ठिकाणी बाऊन्सच्या दुचाकी उपलब्ध असतील.दुचाकीचे काम झाले की नंतर शहरात असणाऱ्या बाऊन्सच्या विविध पार्किंग लॉटमध्ये दुचाकी ठेवायची आहे.