Thursday, December 19, 2024

/

राज्योत्सव झाला आता बाटल्यां आणि ग्लास गोळा करण्याकडे लक्ष देण्याची गरज

 belgaum

बेळगाव हे कर्नाटकाचे भासविण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा अपुरा पडत असल्याने बाहेरून मागविण्यात आलेल्या भाडोत्री गुंड राज्योत्सव साजरा करणाऱ्या प्रशासनाला आता बेळगाव शहरात मद्य ढोसून कचरा करणार्‍या बाटल्या आणि ग्लास गोळा करण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून दरवर्षीच हा कारभार सुरू आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

राज्योत्सवासाठी अनेक ठिकाणी वाहतूक बंद करून साऱ्यांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने मात्र स्वच्छता राबविण्यातकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. राजयोत्सव संपला मात्र भाडोत्री गुंडाने सार्वजनिक ठिकाणी आणि मैदान यावर दारू ढोसून जो कचरा केला आहे, तो कचरा काढण्यासाठी मनपा लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्या कारभारामुळे सार्वजनिक ठिकाणी ही सुरक्षित राहिली नाही असेच दिसून येत आहे.

राजयोत्सव मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सरकारने पैशांची उधळण केली आहे. मात्र बेळगाव शहर आणि परिसरात दारू पिणाऱ्यानी बराच कचरा केल्याचे दिसून येत आहे. नको तिथे बसून बाटल्या कचरा आणि प्लास्टिक ग्लास सर्वत्रच स्वच्छता केली आहे. त्यामुळे या भाडोत्री गुंड कचरा करण्यासाठी आणण्यात येते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवजयंती आणि गणेशोत्सव मिरवणुकीत प्रशासन डॉल्बी बंदीचा आदेश काढते. मात्र राज्य मिरवणुकीत त्यांचा हा आदेश पायदळी तोडल्यानंतर पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेण्यातच धन्यता मानतात. अनेक ठिकाणी बाटल्या व ग्लासचा थर आहे. त्यामुळे यापुढे तरी पोलीस प्रशासन अशा भाडोत्री गुणांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. हा कचरा काढण्यासाठी मनपा लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.