बेळगाव शहर आणि परिसरातील स्थानिक स्वराज यांच्या निवडणुकाकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या असून सध्या येत असलेल्या विविध बँकांच्या निवडणुकाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुका येत्या जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ही निवडणूक लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बेळगाव शहरातील मराठा बँक, पायोनियर बँक, इंडस्ट्रीयल बँक इतर बँकांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत यासाठी आतापासून जोरदार तयारी करण्यात आली असून प्रचारावर भर देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक भर देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली असून अनेक जण प्रचाराला ही सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार लागणार या आशेवर अनेक जण होते. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र पोटनिवडणुकीमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या मे महिन्यात दरम्यान स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका सुरू होण्याची माहिती मिळाली आहे. मात्र सध्या बेळगावात विविध बँकांच्या निवडणुकांकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहेत. यासाठी बँकांनी ही तयारी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
बेळगाव शहरातील मराठा बँक पॉयोनियर बँक, इंडस्ट्रीयल बँक या महत्त्वाच्या बँकांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार आहेत. यामुळे संबंधित बँकांतील सदस्यांनी गुप्त प्रचाराला सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. या बँका झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक होणार असून याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.