दुचाकी वाहने चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळक्याला बेळगाव पोलिसांनी गजाआड केलं आहे.
शहर आणि जिल्ह्यातून चोरी करून विक्री करत असलेल्या 2 लाख 75 हजार किंमतीच्या 11 दुचाकी माळ मारुती पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
परशुराम कोळी वय 28,जमीर शेख वय 29, अजीम रझाक मुल्ला वय 23 रा.आझाद नगर, रिझवान रफिक महात वय 28, वसीम इम्तियाज समशेर वय 23, मोहम्मद युनिस ताशेवाले वय23 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
खानापूर तालुक्यातील बिडी परिसरातील दुचाकी चोरून बेळगावातील जमीर नावाच्या मकेनिकल पकडून गाडीचे पार्ट्स विकत होते अशी कबुली त्यांनी पोलीस तपासात दिली आहे.पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली माळ मारुती पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी कारवाई केली आहे