बेळगाव तालुक्यातील कंग्राळी(खुर्द) गावचे सुपुत्र कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांना त्यांनी आजवर सैन्यात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल चार वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी ही मुदतवाढ कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांना दिली आहे.
कर्नल बेन्नाळकर हे सध्या हैदराबाद येथे सेवा बजावत आहेत.आता त्यांना मुदतवाढ मिळाली असून यांची नियुक्ती पंजाब येथे स्टेशन स्टाफ ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे.54 वर्षाचे कृष्णा बेन्नाळकर यांनी सैन्यात 34 वर्षे सेवा बजावली आहे.
आपल्या सेवकाळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावून महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.अगदी मोजक्याच व्यक्तींना लष्करात मुदतवाढ दिली जाते.मुदतवाढ मिळाल्यामुळे कृष्णा बेन्नाळकर हे डिसेंबर पासून आणखी चार वर्षे देशसेवा करणार आहेत.
सुरुवातीला दहावी पर्यंत शिक्षण घेऊंन त्यानी सैनिक म्हणून भर्ती झाले होते त्या नंतर ऑफिसर होण्यासाठी त्यांनी बी ए पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यावेळी यु पी एस सी परिक्षा देत अधिकारी बनले होते.
मी ज्यावेळो सैन्यात दाखल झालो तेंव्हा मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते स्वतः मेहनत करून अधिकारी बनलो आहे मात्र माझा मुलगा कॅप्टन अंशुल (सध्या जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत आहे)याला अधिकारी बनवण्यासाठी मार्गदर्शन केलं.ग्रामीण भागातील युवकांनी ध्येय निश्चित करण्याची गरज आहे ध्येय निश्चित करून मेहनत घेतल्यास ग्रामीण भागातील मुलांना देखील सैन्यदलात अधिकारी म्हणून यश मिळू शकते.बेळगाव ग्रामीण भागातील होतकरू मुलांना मार्गदर्शन करायला मी तयार आहे असे त्यांनी बेळगाव Live शी बोलताना सांगितले.