स्मार्ट सिटीची कामे प्राधान्याने पूर्ण करा असा आदेश स्मार्ट सिटीचे एम डी शशिधर कुरेर यांनी बजावला आहे.पण त्यांचा आदेश कर्मचारी आणि कंत्राटदार गांभीर्याने घेत नाहीत की काय अशी शंका येऊ लागली आहे.
एसपीएम रोडच्या काँक्रीटीकरणाला प्रारंभ होऊन एक महिना लोटला.बँक ऑफ इंडिया ते आठले गुरुजी क्रॉस पर्यंत एका बाजूचे काम झाले आहे पण दुसऱ्या बाजूचे आणि त्या पुढील रस्त्याचे काम मात्र बंद आहे.
एका बाजूचा रस्ता बंद असल्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू आहे.त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत होत आहे.रस्त्यावरील खड्डे परवडले पण स्मार्ट सिटी योजनेतील रस्ते नको म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.
बेळगाव शहरात अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती नवीन रस्ते बनवले जात असल्याने अनेक ठिकाणी रहदारीला समस्या निर्माण होत आहे.त्यामुळे कुरेर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.