Monday, December 30, 2024

/

बेळगाव पोट निवडणूक भाजपकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

 belgaum

शेजारच्या महाराष्ट्रात सत्तांतर झाल्या नंतर कर्नाटकातील 15 विधानसभा मतदार संघात पाच डिसेंम्बर रोजी पोट निवडणूक होत आहे.भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार काठावर असतानाच या पोट निकडणूका होत आहेत त्यामुळे त्यांना या निवडणुकीत विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना चिंतेने ग्रासले आहे.राष्ट्रीय भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून 15 पैकी किमान 12 तरी जागा जिंकणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे त्यामुळे राज्यातील राज्यातील भाजप नेऱ्यांनी पोट निवडणूकितील भाजप उमेदवाराना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी सूचना केली आहे.

कर्नाटकाच्या 15 विधानसभा निवडणुकांचा निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळं कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकार वाचवण्यासाठी भविष्यात ऑपरेशन लोटस राबवाव अनिवार्य ठरणार हे मात्र निश्चित .

बेळगाव जिल्ह्यात गोकाक अथणी आणि कागवाड, या तीन विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली आहे.गोकाक विधान सभा मतदारसंघातुन काँग्रेस सोडून ऐन वेळी भाजपात प्रवेश केलेल्या रमेश जारकीहोळी हे रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात निधर्मी जनता दलाचे अशोक पूजारी तर कॉग्रेसच्या वतीनं रमेश जारकीहोळी यांचे लहान बंधू लखन जारकीहोळी हें निकडणूक लढत आहे.गोकाक मधील ही निवडणूक वर करणो तिरंगी दिसत असली तरी खरी लढत रमेश जारकीहोळी आणि अशोक पुजारी यांच्यात आहे.प्रामुख्याने या मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने त्याचा लाभ अशोक पुजारी यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तिन्ही उमेदवार मत खेचणारे आहेत या मत विभागाणीचा लाभ अशोक पुजारी होईल का अशी शक्यता व्यक्त होत आहे.गोकाक मतदारसंघात एकूणच जारकीहोळी बंधू विषयींचे वातावरण पुरक नसल्याने मतदार नवा चेहरा निवडण्या कडे कल दिसत आहे.रमेश जारकीहोळी चार वेळा गोकाक मधून काँग्रेसच्या तिकिटावर चार वेळा निवडून आले असले तरी त्यांनी पक्ष बदलल्याने त्यांच्या वरच या भागातील जनतेच प्रेम कमी झाल्याचे जाणवत आहे.एकूणच गोकाक विधान सभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचे अवलोकन करता रमेश जारकीहोळी यांच्या एकंदरीत पक्ष बदलू भूमिके मुळे नाराजी दिसून येत आहे.

Fight for gokak
Fight for gokak

अथणी तालुक्यातील कागवाड विधानसभा मतदारसंघात भाजपने तिकीट नाकारल्याने माजी आमदार राजू कागे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर भाजप कडून पक्षांतर केलेले श्रीमंत पाटील यांनी उमेदवारी मिळवली आहे.मागील विधानसभा निवडणूकित श्रीमंत पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडनुक जिंकत रमेश जारकीहोळी यांच्या सोबत भाजपात प्रवेश केला.भाजपात जाण्याने त्यांच्यवर देखील नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.त्यामुळे याचा लाभ राजू कागे लाभ मिळू शकतो.कागे हे हाडाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तळा गाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध असल्याने त्यांना मतदारांचो साथ मिळू शकते मात्र वंचित विकास आघाडीचे शेट्टी यांनीही आवाहन उभे केले आहे.

अथणी विधान सभा मतदारसंघात महेश कुमटहळळी भाजपकडून तर गजानन मंगसूळी हे काँग्रेस कडून रिंगणात आहे महेश यांना यांना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या समर्थकांचा अंतर्गत विरोध आहेत्याचा परिणाम या निवडणुकिवर व्हायचो शक्यता आहे त्यांची प्रतिमा देखील म्हणावी तेवढी जमेची बाजू दिसत नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.