उच्च न्यायालयाने एपीएमसी भाजी मार्केटमधील तीस दुकानाचा लिलाव करण्या संबंधी लागलेल्या निकालाची प्रत मिळाली नसल्याचे निमित्त पुढे करून मंगळवारी होऊ घातलेली त्या 30 गाळ्यांची लिलाव प्रक्रिया शुक्रवारी पर्यंत पूढे ढकलण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांनी ए पी एमसी अध्यक्ष व अधिकाऱ्यां समोर उच्च न्यायालयाचा निकाल येई पर्यंत प्रक्रिया राबवू नये व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या समोर प्रक्रिया राबवा तसेच अनुसूचित जमातीच्या कोट्यातील दुकाने इतरांना देऊ नये अशी मागणी करत लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यास विरोध केला.
यावेळी सामान्य कोट्यातून लिलावात भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांनी मुदती प्रमाणे आजच लिलाव करा अशी मागणी जोर लावून धरलीएपीएमसी चोर है अशा घोषणाही दिल्या.
त्यामुळे दोघांच्या मध्ये अडकलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी दुपारी निर्णय देण्याचे जाहीर केले.शेवटी कोणताच तोडगा न निघाल्याने सदर लिलाव प्रक्रिया शुक्रवारी घेण्याचे आश्वासन दिले आहे.
जय किसान या भाजी व्यापाऱ्यांच्या संघटनेने सहा महिने झाले तरी दुकाने मिळाली नाहीत म्हणून सोमवारी आंदोलन छेडले होते.एकूण 130 दुकानापैकी 100 दुकानाचा लिलाव यापूर्वी झालेला आहे.उरलेली तीस दुकाने अनुसूचित जाती जमातीसाठी ठेवण्यात आली होती.ही दुकाने आपल्याला मिळावीत म्हणून दलित संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे धरण्यात आले.नंतर ही संघटना उच्च न्यायालयात गेली पण न्यायालयाने लिलाव प्रक्रिया पूर्ण करा पण दुकाने देऊ नका असा आदेश बजावला.त्यामुळे मंगळवारी लिलाव ठरला होता.पण दलित संघटनेने एपीएमसी समोर आंदोलन छेडले.आमदार सतीश जारकीहोळी येऊदेत मग निर्णय घ्या असा पवित्रा घेतला.
इकडे जय किसान व्यापारी संघटनेने देखील लिलाव करा म्हणून जोर केला.त्यामुळे सगले गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एपीएमसी अध्यक्ष आणि सेक्रेटरीला देखील धारेवर धरले.अखेर याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्याची घोषणा एपीएमसी तर्फे करण्यात आली.