बेळगाव विमानतळावर महिलांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहे.प्रवाशांच्या आगमन,निर्गमन ठिकाणी तसेच अन्य एका ठिकाणी ही मशीन बसविण्यात आली आहेत.
काही दिवसात प्लास्टिक बाटल्याची विल्हेवाट लावण्याची मशीन देखील बसविण्यात येणार आहे.सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविल्यामुळे महिलांची चांगली सोय होणारं आहे.यापूर्वीच विमानतळावर केवळ एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक वस्तूवर बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे स्ट्रॉ, प्लास्टिक ग्लास,प्लेट्स वस्तू विमानतळावर वापरता येत नाहीत अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
बेळगाव विमान तळावर गर्दी वाढली आहे दरमहा अंदाजे 21 हजार पेक्षा अधिक प्रवासी ये जा करत आहेत त्यामुळे विमान तळ प्रशासनाला प्रवाश्यांना लागणाऱ्या वस्तूंची देखील काळजी घ्यावी लागणार आहे त्याचाच एक भाग म्हणून विमान तळावर नॅपकिन पॅड बसवण्यात आले आहेत.