शहापूर बँक ऑफ इंडिया समोर तरुणांच्या एका गटाने दोन तरुणांना बेदम मारहाण केली.लाथा,बुक्क्या घालून दहाहून अधिक तरुणांनी ही मारहाण केली.दोन तरुणांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली.
यावेळी तेथे बघ्यांची गर्दी जमली होती.मार खाल्लेल्या दोन तरुणांना नंतर चालताही येत नव्हते अशी त्यांची अवस्था झाली होती.यावेळी एक पोलीस तेथे होता पण त्याने बघ्याची भूमिका घेऊन गप्प थांबणे पसंद केले.
नंतर पोलीस आल्यावर मारहाण करणाऱ्या तरुणांची पांगापांग झाली.रात्री अकरा वाजता ही घटना घडली.शहापूर पोलिसांत याबाबत रात्री पर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.