बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे व्यवहार हायटेक म्हणजेच संगणकीकृत केले जात आहेत .यासाठी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आले आहेत. व्यवहार्य कागदपत्रांमध्ये वेगवेगळे ठराव, ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या बैठका, जनरल बॉडी च्या बैठका आणि निर्णयाच्या प्रती या सगळ्या कागदपत्रांचे संगणकीकरण केले जात आहे. जिल्हा पंचायतीचे सीईओ के व्ही राजेंद्र यांनी जिल्ह्यातील 506 ग्रामपंचायतींना प्रत्येकी पंचवीस हजाराचा निधी या कामासाठी दिला आहे. या कामातून सर्व व्यवहार संगणकीकृत झाले तर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार थांबले जातील. असा विचार आला आहे. यासाठी कर्नाटक सरकारने विशेष निधी दिला असून तो निधी ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे. या निधीतून स्कॅनिंग च्या माध्यमातून सर्व व्यवहार कागदपत्रे संगणकीकृत केले जात आहेत.
कोणत्याही बैठकीची तारीख घातली की बैठकीचा ठराव उपलब्ध होईल. अशी व्यवस्था या संगणकीकृत व्यवस्थेत केली जाणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींचे पीडीओ ग्रामसेवक आणि कारकून वर्गाला एक नवीन काम लागले आहे.
सर्व च्या सर्व कागदपत्रे संगणकीकृत करून त्याचा अहवाल लवकरात लवकर देण्याची सूचना जिल्हा पंचायतीच्या सीईओ यांनी केली आहे. त्यामुळे बाकीची सर्व कामे बाजूला ठेवून हे काम पहिल्यांदा करण्याची वेळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. यापूर्वी ठराव हरवला किंवा बैठकीतील मुद्दे गहाळ करण्यात आले .अशा प्रकारची कारणे देण्यात येत होती. मात्र आता मात्र ते करता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात येत आहे.