भर मार्केट मध्ये केली तीन लाखांची बॅग लंपास
हार्डवेअर दुकानातील व्यापारातून जमलेली पैश्याच्या रक्कमेची बॅग बँकेला भरायला जाताना पाठीमागून धक्का देत तीन लाखांची रोख रक्कमेची बॅग लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी पवणे बाराच्या दरम्यान घडली आहे.
कांदा मार्केट मध्ये दिवसा ढवळ्या ही घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
कांदा मार्केट मधील श्री राम हार्ड वेअर मधील कामगार वसंत कलघटकर हे व्यापारातून जमलेली रोख रक्कम कडोलकर गल्लीतील युनियंन बँकेत भरण्यासाठी जात असताना मागील बाजूनं धक्का देत हातातील तीन लाखांची बॅग लंपास केली.
अंदाजे 20 ते 25 वयोगटातील अज्ञात युवकाने ही बॅग लंपास केली आहे. भर बाजारात ही लूट घडल्याने पोलिसांनी अश्या घटना स्थळी पहाणी करून पंचनाम केला,खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.