अंगणवाडीमध्ये मुलांना इंग्रजी शिकवण्याबद्दल विचार करत आहे अशी माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी बेळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
अंगणवाडीमध्ये येणारी मुले इंग्रजी शाळेला जातात म्हणून संमिश्र सरकारने सरकारी शाळांमध्ये एल केजी आणि यु केजी वर्ग सुरू करण्याचा आदेश बजावला होता.ही बाब मला अंगणवाडी सहाय्यीकानी माझ्या निदर्शनास आणून दिली आहे.इंग्रजी भाषा आजच्या मुलांसाठी महत्वाची आहे.
त्यामुळे कन्नड भाषे बरोबरच व्यवहारासाठी इंग्रजी भाषा मुलांनी शिकणे आवश्यक आहे.त्यामुळे अंगणवाडीत इंग्रजी भाषा शिकवावी काय याबाबत सरकार विचार करत आहे.याबाबत एक बैठक झाली असून आणखी एक बैठक होणार आहे.या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही जोल्ले यांनी सांगितले.