पावसामुळे अनेक रस्त्यांची धूळधाण उडाली आहे.यरमाळ ते नागेनहट्टी या रस्त्याची देखील पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.एक वर्षांपूर्वीच सदर रस्ता करण्यात आला होता.पण सध्या सुरू असलेल्या पावसाने बऱ्याच ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे.
या रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करणे धोकादायक बनले आहे.दररोज या मार्गावरून ये जा करणाऱ्या लोकांना त्रासदायक झाले आहे.या खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती लवकरच करून जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी सांगितले.
मागील महिन्यात नंदीहळळी येथील रस्ता देखील अश्याच पद्धतीनं वाहून गेला होता त्यामुळे बेळगाव गर्लगुंजी वाहतूक बंद होती.बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था एकदम बिकट झाली असून प्रशासनाने तातडीने असे रस्ते दुरुस्त करण्याची गरज आहे. रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या मूळ गावाजवळचा हा रस्ता असून त्याची त्वरित दुरुस्ती झाली पाहिजे अश्या प्रतिक्रिया या भागांतील लोकांकडून व्यक्त होत आहेत.
पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत.खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.लवकरात लवकर खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अशी माहिती जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी दिली.