लायन्स क्लब ऑफ बेळगाव च्या वतीने बेळगाव रेल्वे स्थानकावर माणुसकीची भिंत संकल्पना सुरू करण्यात आली आहे, रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्याबाजूला माणुसकीची भिंत असणार असून हा एक कायमस्वरूपी प्रकल्प आहे.
आपल्याकडील चांगल्या दर्जाचे कपडे पुस्तके बूट अशा वस्तू या ठिकाणी आणून द्यायचे असून गरजू लोकांसाठी त्या तेथे ठेवण्यात येणार आहेत .तेथे आणून द्यायच्या वस्तू ह्या वापरण्या सारख्या असाव्यात ही अट आहे.
कोणीही आपल्या इच्छेनुसार अनावश्यक कपडे पुस्तके आणून देऊ शकतो याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे. देशातील अनेक शहरात सामाजिक दृष्ट्या लोकप्रिय झालेला हा प्रकल्प बेळगावात सुरू झालाय.या अगोदर माजी महापौर विजय मोरे यांनी देखील असाच प्रकल्प सुरू केला होता.बेळगाव रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकल्प सुरू झाल्याने याला प्रतिसाद मिळत आहे.