सकारात्मक विचार बाळगला तर काय करता येते याचे उदाहरण म्हणजे नंदगड ग्राम पंचायत असेच म्हणावे लागेल.कचरामुक्त गाव करण्यासाठी नंदगड ग्राम पंचायतीने कंबर कसली असून यामध्ये गावकऱ्यांना देखील सहभागी करून घेतले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेला यशस्वी करण्यासाठी या गावकऱ्यांनी पुढाकार घेत आगळा आणि वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
कचरा मुक्त नंदगड गाव बनवण्यासाठी गावात असलेल्या सर्व कचऱ्याची उचल करून तो एकत्रित करून वेगवेगळा केला जात आहे. कचरा गोळा करून साठवण्यासाठी ग्राम पंचायतीने ए पी एम सी मध्ये जागा केली आहे. या ठिकाणी ग्लास ,बाटल्या ,प्लास्टिक कचरा कागदी कचरा असे वेगवेगळे करून कचरा साठवला जात आहे.
ग्राम पंचायत सदस्य पी डी ओ व ग्रामस्थांच्या मदतीने कचरा एकत्रित करून गोळा केला जात आहे. यासाठी पंचायतीच्या वतीनं चार कर्मचारी व एक वाहन नेमून कचरा संग्रहित करण्यात येत आहे. कचरा गोळा करून भविष्यात रिसायकल करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. या योजनेमूळे नंदगड हे स्वच्छ नंदगड बनणार आहे याचा आदर्श इतर ग्राम पंचायतींनी घ्यायला हरकत नाही.
सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे,पर्यावरण वादी संतोष ममदापुर,ट्री मॅन ऑफ बेळगाव किरण निपाणीकर आदींनी ग्राम पंचायतीला भेट देऊन या कचरा निवारण प्रोजेक्टची पहाणी केली.ग्रामस्थ ग्राम पंचायत अध्यक्ष इतरांशी चर्चा करून कश्या पद्धतीने कचरा मुक्त नंदगड करणार याची माहिती जाणून घेतली.
गावचा निधी वापर रस्ते पथदीप आणि पंचायत कार्यालय बनवण्यासाठी योग्य पद्धतीनं कसा करण्यात आलाय, पुढच्या गावच्या योजना काय आहेत आदर्श गाव कसं बनलंय याची माहिती ग्रामस्थांशी चर्चा करत जाणून घेतली.