बी एस येडीयुरप्पा मंत्रिमंडळात मंत्री पद गमावलेले माजी मंत्री उमेश कत्ती सध्या नाराज असल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.काल मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांची भेट न घेता विमानतळावरून परतल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या.बुधवारी सकाळी स्वता मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी स्पष्टीकरण देताना कत्ती नाराज नाहीत असे वक्तव्य केले होते.
या सगळ्या नंतर उमेश कत्ती यांनी देखील स्वता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही मंत्री होणे माझ्या नशिबात नसेल मात्र नशिबाने साथ दिली तर डिसेंबर नंतर मंत्री होऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. बुधवारी सकाळी त्यांनी येडीयुरप्पा यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
लक्ष्मण सवदी माझे मित्र आहेत ते मंत्री बनलेत हे स्वागतार्ह आहे बेळगावात अजूनही पूर ग्रस्तांना मदतीचे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मी जे काम करतो त्यावर मला पूर्ण विश्वास आहे ज्योतिष भविष्य यावर कधीच विश्वास ठेवत नाही मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता म्हणून मी त्यांची भेट घेतली आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्री आमचे नेते आहेत त्यांच्या पासून लांब गेलो नाही मी सांगितलेली सर्व काम होताहेत हाय कमांड आणि त्यांच्यात दुमत नाही अशी देखील स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत अगोदर त्यांचे बंधू रमेश कत्ती यांचे तिकीट कापण्यात आले त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात 8 वेळा निवडून येऊन देखील उमेश कत्तीना मंत्री पद देण्यात आले नव्हते. दोन्ही कत्ती बंधूंचे भाजपात खच्चीकरण सुरू आहे का?हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.