Sunday, December 22, 2024

/

दुचाकीची बसला ठोकर-सुतगट्टी घाटातील अपघातात दाम्पत्य ठार

 belgaum

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी जवळ झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचे तीन वर्षीय बालक जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील राम धाब्याजवळ हा अपघात घडला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्ती जुने गुडगेनट्टी येथील रहिवासी असून एका कार्यक्रमात जाताना बसला ठोकरल्याने हा अपघात घडला आहे.या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राकडून मिळाली आहे.

Road accident logo

भरमा यल्लाप्पा गस्ती वय 28 त्यांची पत्नी सावित्री वय 25 अशी या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे तीन वर्षे बालक बजरंगी उर्फ भद्रा व त्यांचा आणखी एक नातेवाईक संजू भरमा गस्ती वय 42 हे दोघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

जुने गुडगेनट्टी येथील यल्लापा व त्यांची पत्नी एका आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी मोटर सायकल वरून गावी जात होती. दरम्यान त्या गाडीवर त्यांचा तीन वर्षे बालक आणि त्यांचा एक नातेवाईक होता. मोटरसायकलीवर नियंत्रण करता न आल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या बस धडक दिली. या धडकेत त्याची पत्नी जागीच ठार झाले आहे. दसऱ्याच्या काळात हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती काकती पोलिस स्थानकात देण्यात आली. यावेळी काकती पोलीस स्थानकाचे निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे . सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. येथील राम धाब्याजवळ हा अपघात घडला आहे . काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.