Monday, December 30, 2024

/

ट्रु जेटची सेवा 27 पासून

 belgaum

‘उडान’ योजनेंतर्गत उपलब्ध झालेल्या चार शहरांना सांबरा विमानतळावरून विमानसेवा उपलब्ध करण्याचे संकेत trujet कंपनी कडून मिळाले आहेत. दि. 27 ऑक्टोबरपासून या फेऱ्या कार्यरत होणार आहेत.

Trujet कंपनीला उडान मधून हैद्राबाद, म्हैसूर, कडप्पा आणि तिरुपती या शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. आगामी हिवाळी वेळापत्रकात(schedule) मध्ये या चारही शहरांना विमासेवा सुरू करण्याचे नियोजन कंपनीकडून करण्यात येत आहे. त्यानुसार 27 ऑक्टोबरपासून या फेऱ्या सुरू होण्याचे संकेत कंपनीकडून मिळाले आहेत एकाच वेळी चार विमानफेर्या सुरू होणार असल्याने विमानतळावरील वर्दळ वाढणार आहे. धार्मिक पर्यटकांसाठी महत्वाची तिरुपती फेरी सुरू होणार असल्याने बेळगावकराना रेल्वे बरोबर विमानसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

अद्याप कोणत्याच फेरीसाठी बुकिंग सुरू झाले नाही मात्र कंपनीकडून सोशल मीडियावर सेवा सुरू करण्यासंदर्भात माहिती अपलोड करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.