मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या द ट्रॅकस इंटरनॅशनल कारनिव्हल योग चॅम्पियनशिप 2019 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या दोन मुलींनी एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदके पटकावली आहेत.
मलेशियाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे दि.11 ते 13 दरम्यान या स्पर्धेचे आय डी डी सी,शा आलम, सेलनगोर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये आठ वर्षाखालील गटात निश्चल महेश अर्कसाली हिने कांस्य पदक मिळवले.
अकरा ते चौदा वयोगटात नक्षत्रा सतीश शेट्टी हिने सुवर्णपदक मिळवले.तर वीस वर्षाखालील गटातही नक्षत्राने कांस्य पदक पटकावले.या स्पर्धेमध्ये पंधरा देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.