अशोक नगर येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांना चालना देण्यात आली आहे. मात्र ही कामे करण्यात दिरंगाई होत असल्याने अनेकांना याचा फटका बसत आहे. दरम्यान अशोक नगर येथे शनिवारी सकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. यावेळी एका महिलेचा अपघाती निधन झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दीपलक्ष्मी सोमदत्त नाईक वय 31 रा.अशोक नगर बेळगाव असे त्या महिलेचे नाव आहे. एकेरी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात घडला अशी माहिती देण्यात येत आहे. दिपलक्ष्मी व तिचा पती सोमदत हे दोघे भी दुचाकीवरून अशोक नगर येथून चालले होते. मात्र एकेरी वाहतूक असल्याने वाहन सावकाश नेत असताना देखील हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
अशोक नगर येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गटारी व रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक इतरत्र वळून काही मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दिपलक्ष्मी व त्यांचा पती सोमदत नाईक हे होंडा अॅक्टिवा वरून जात होते. त्यावेळी दीपलक्ष्मी यांची ओढणी चाखांमध्ये अडकून हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असले तरी याला जबाबदार स्मार्ट सिटीचे कामच असल्याचे सांगण्यात येत आहेत.
सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने येथील वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात याची माहिती देण्यात आली. उत्तर विभागातील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. उत्तरीय प्रक्रिया पूर्ण करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे तरी असा भोंगळ बरोबर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे.