व्हाईट सिमेंट काँक्रेट नवीन गटार आणि सायकल ट्रॅक सह किल्ला सर्कल ते गोगटे सर्कल ब्रिज पर्यंत साडे चार कि.मी. रस्ता स्मार्ट होणार आहे. स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामातून 38 कोटी रुपये खर्चून या रस्त्याचा कायापालट केला जाईल यासाठी खास दसऱ्याच्या मुहूर्त साधून कामाची सुरुवात केली आहे अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या उपस्थितीत बेनके यांनी भूमिपूजन करत कामाला सुरुवात केली.
सम्राट अशोक चौक किल्ला सर्कल ते आरटीओ सर्कल चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक ते गोगटे सर्कल आणि एस पी ऑफिस ते धर्मनाथ सर्कल असा 4.70 किलो मीटर रस्ता स्मार्ट केला जाणार आहे.यावेळी मोठ्या संख्येने आमदार समर्थक उपस्थित होते.
रहदारीची अडचण जनतेनी सहकार्य करावं-बेनके
काम सुरू असणाऱ्या भागातून अवजड वाहनांना प्रवेश बंदी तर एकेरी वाहतूक हे पर्याय निवडले जाणार आहेत जरी हे साडेच कि मी. लांब रस्त्याचे काम एक वर्ष अवधीचे असले तरी कमीत कमी तीन महिन्यांत केवळ रस्त्याचे काम पूर्ण होईल असेही बेनके म्हणाले.
सायकल ट्रॅक इतर कामाला वेळ लागेल मात्र रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल.रहदारीचा त्रास होईल तरी जनतेने सहकार्य करावे असे देखील आवाहन त्यांनी केलंय.
बेळगाव शहरात दाखल होताच किल्ला सर्कल ते गोगटे पर्यंत रस्ता महत्वाचा आहे या कामा नंतर हा रस्ता स्मार्ट होणार आहे.रहदारी बाबत पोलीस खात्याच्या वतीनं रहदारी बदल कसा होतो याकडे पहावे लागेल.