शहरातील सात रोटरी क्लब,माहेश्वरी युवक संघ,इचलकरंजी टेक्सटाईल रोटरी क्लब आणि वासवाणी ट्रस्ट यांच्यातर्फे दिव्यांगासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बी के मॉडेल हायस्कुलमध्ये झालेल्या या शिबिरात तीनशेहून अधिक दिव्यांग सहभागी झाले होते.शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांगाच्या हात आणि पायाचे मोजमाप घेण्यात आले.
पंधरा दिवसात या दिव्यांगाना कृत्रिम हात आणि पाय देण्यात येणार आहेत.आगामी काही दिवसात पाचशेहून अधिक दिव्यांग येणार असून त्यांचेही हात किंवा पायाचे मोजमाप घेऊन त्यांनाही कृत्रिम हात आणि पाय देण्यात येतील असे रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षांनी सांगितले.दिव्यागांचे जगणे सुसह्य आणि सुखकर व्हावे यासाठी कृत्रिम हात आणि पाय देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.