Wednesday, December 25, 2024

/

जय गणेश मध्ये साड्या खरेदीसाठी गर्दी

 belgaum

सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आहे ते म्हणजे गणेश टेक्सटाईल.अत्यंत वाजवी दर,उत्तम दर्जा आणि ग्राहकाला दिली जाणारी आदराची वागणूक यामुळे दिवाळी खरेदी जय गणेशमध्येच करायची अशी साऱ्यांची भावना आहे.साड्या,ड्रेस मटेरियल,सुटिंग, शर्टच्या कपड्या बरोबरच ग्राहकांची आवड लक्षात घेऊन जय गणेशने आता प्युअर सिल्क साड्या आणि घागरा याचे स्वतंत्र दालन उघडले आहे.

Jai ganesh
Jai ganesh cloth emporium

अत्यंत रास्त दर आणि हजारो प्रकारच्या व्हरायटी यामुळे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून जय गणेश आणि ग्राहक यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे.उत्तम दर्जा असल्यामुळे एकदा जय गणेशमध्ये खरेदी केलेला ग्राहक कायमचा जय गणेशचा ग्राहक बनून जातो.

Jai ganesh

लग्न,मुंजी,वास्तुशांती,वाढदिवस यासाठी आहेर देण्यासाठी साड्यांचे भव्य दालन आहे. बंगळुरु सिल्क, कांजीवरम सिल्क,धर्मावरम सिल्क,कुट्टू सिल्क,प्युअर ब्रोकेड कंचिल, प्युटसॉफ्ट सिल्क आदी नमुन्याच्या साड्या व्होलसेल दरात मिळण्याचे बेळगाव शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे जय गणेश . या व्यतिरिक्त विविध प्रकारचे सुटिंग ,शर्टचे कापड चुडीदार सेट्स व ड्रेस मटेरियल आमच्याकडे उपलब्ध आहेत अशी माहिती जय गणेशचे मालक संतोष वाधवा यांनी बेळगाव Live कडे बोलताना दिली.

गणेश चतुर्थी,दसरा,दिवाळी,लग्न,मुंज,वास्तुशांत असो खरेदी जय गणेशमध्येच करायची असे समीकरण बनले आहे.उत्तम दर्जा,हजारो प्रकारची व्हरायटी आणि वाजवी दर यामुळे खरेदी करायची तर जय गणेश मधेच.केवळ बेळगाव नव्हे तर गोवा,सिंधुदुर्ग,चंदगड,आजरा, गडहिंग्लज अशा ठिकाणाहून ग्राहक खरेदीसाठी जय गणेशमध्ये येतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.