बेळगाव तालुक्यातील हलगा गावची कन्या अक्षता कामती हिने ज्युनियर नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रेकॉर्डब्रेक कामगिरी करत इतिहास रचला आहे. 13 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत बिहार येथील बोधगया येथे झालेल्या 32 व्या ज्युनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग नवीन रेकॉर्ड बनवलं आहे.
तिने या स्पर्धेत 81 किलो वजन गटात सहभाग घेत सुवर्ण पदकाची कमाई तर केलीच आहे या शिवाय उच्चांकी वजन उचलत जुने नॅशनल रेकॉर्ड तोडत नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतलं आहे.अक्षता हिने 106 किलो वजनाचे जुने रेकॉर्ड मागे टाकत 120 किलो वजन उचलत नवीन ज्युनियर राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
अक्षता ही हलगा गावची असून तिचे वय 20 वर्षे आहे ज्युनियर नॅशनल स्पर्धेत तिने आता पर्यंत चार गोल्ड एक सिल्व्हर मेडल आणि सिनियर नॅशनल मध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे.ती बंगळुरू येथे सराव करत असते. तिच्या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिचे वडील बसवंत कामती हे शेतकरी आहेत.याअगोदर तिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये कौतुक केलं होतं