खंजर गल्ली येथे रात्री दोन गटात हाणामारी होऊन एकावर चाकूहल्ला झाला असून हल्ला करणारे फरारी झाले आहेत.कारचे हेडलाईट प्रखर केले म्हणून समोरून येणाऱ्या कारमधील व्यक्तींनी वाहन थांबवून लाईट का प्रखर केला अशी विचारणा करून हाणामारी केल्याची माहिती मिळाली आहे.
खंजर गल्लीतील रिझवान शफी मोमीन असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे.उपचारासाठी त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चाकूहल्ला करणारे गोव्याचे लायिक अहमद हरुन मोतीवले आणि सवेज शेरखान पठाण हे दोघे फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
चाकूहल्ला केलेल्या गोव्याच्या व्यक्ती आपल्या वाहनातून येत होते .त्यावेळी प्रखर हेडलाईट का लावला म्हणून त्यांची दुसऱ्या वाहनातील व्यक्तीशी वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.पोलिसांनी सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.