पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी विषकारी प्लास्टिक बंदी होणे गरजेचे आहे प्लास्टिक मुक्त देश घडवण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला सर्वांनी साथ देत प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन रेल्वेराज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी केलं आहे.
महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बेळगाव शहरातील मारवाडी युवा मंच या संस्थेच्या वतीने प्लास्टिक बंदी विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीची कित्तुर राणी चन्नममा चौकात सुरुवात केल्यावर ते बोलत होते.यावेळी राज्य भाजप अध्यक्ष नलिन कुटील,माजी आमदार संजय पाटील यांनीही प्लास्टिक बंदी विरोधात जागृती करत कपड्याच्या पिशव्या वापरा असे आवाहन केले.
मारवाडी युवा मंचच्या महिला युवक इतर सभासदांनी हातात फलक घेत प्लास्टिक विरोधी घोषणाबाजी केली व प्लास्टिक वापरू नये असे आवाहन जनजागृतीच्या माध्यमातून केलं मंच चे अध्यक्ष संतोष व्यास, इवेंट चेयरमैन विक्रम राजपरोहित सचिव संजय पुरोहित, अजय हेड़ा, गोपाल उपाध्याय, हरीष राजपरोहित, पवन तापड़िया, दिनेश राजपरोहित,कृष्ण जोशी, सरस्वती बजाज आदी उपस्थित होते.