कळसा भांडुरा पिण्याच्या पाणी योजनेला पर्यावरण खात्याकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे आता कर्नाटकचा पाणी वळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कळसा भांडुरा प्रकल्प हा म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत सोडण्याची योजना आहे.म्हादईचे पाणी कळसा आणि भांडुरा या नाल्यातून मलप्रभा नदीला सोडण्यात येणार आहे.
कळसा आणि भांडुरातून पाणी मलप्रभेत सोडून त्याद्वारे हुबळी,धारवाड आणि आजूबाजूच्या गावाची पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे.म्हादई जल लवादाच्या आदेशाचा या प्रकल्पामुळे भंग होणार आहे.केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पाठपुरावा करून पर्यावरण खात्याची परवानगी मिळवली आहे असे ट्वीट केंद्रीय वन,पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.