Saturday, January 18, 2025

/

दोन महिन्यानंतरही त्या पिडिओवर कारवाई नाहीच

 belgaum

बाळेकुंद्री खुर्द येथील एका पीडीओला निलंबित केल्यानंतर आणखी तीन पीडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र मागील दोन महिन्यापासून या पिडिओची चौकशी करण्यासाठी जिल्हा पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळच मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मात्र यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरून आपला बचावकार्य सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत मध्येच भ्रष्टाचार सुरू असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बाळेकुंद्री खुर्द येथील पीडिओ पूनम गाडगे हिला जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे या पिडिओने मागील तीन वर्षांचे कार्यकाळाची ही चौकशी करावी अशी मागणी केली होती. यामध्ये आणखी तीन पीडीओ सापडले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस येत आहे. मात्र जिल्हा पंचायतीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्यात टाळाटाळ केली आहे. एका माजी खासदार आणि आमदार असलेल्या नातेवाइकाने ही कारवाई करण्यास विलंब केल्याचे उघडकीस येत आहे.

अरुण नाईक, श्रीशैल नागठाण, प्रशांत मनोळी या तीन पिडिओची चौकशी मागील दोन महिन्यापासून होत आहे. तसे पाहता ही चौकशी पंधरा दिवसात पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र जिल्हा पंचायतीच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने साटेलोटे करून ही चौकशी करण्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत भ्रष्टाचाराला आळा घालण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देण्यावरच काहींनी भर दिल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबणार कधी? असा सवाल उपस्थित होतोय.

मागील दोन ते अडीच महिन्यापासून या तिन्ही पीडिओची चौकशी सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यावर कारवाई झालीच नाही. वरिष्ठ अधिकार्‍याला धरून ही कारवाई विलंब व्हावी यासाठी बरेच प्रयत्न सुरू केले आहेत. काही आर्थिक उलाढाल करून ही चौकशी होऊ नये यासाठी जिल्हा पंचायत संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याला पकडून कारवाई करण्यास विलंब करण्यावर भर देण्यात आल्याचे माहिती उघडकीस येत आहे. यामध्ये विशेष करून अरुण नाईक यांनी बक्कळ पैसा कमवण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर श्रीशैल नागठाण यांनी आपला हात फिरवून व्यवस्था केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर प्रशांत मुन्नोळी यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई कधी होणार? असाच प्रश्न सध्या तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.