स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाला असताना उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी रामतीर्थ नगर भागातील स्मार्ट सिटी आणि बुडा योजनेतून होणाऱ्या विकास कामांची पहाणी करत जनतेला कोणत्याही पद्धतीचा त्रास न होता स्मार्ट कामे करा अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गुरुवारी सकाळी महांतेशनगर रामतीर्थ नगर,वंटमूरी कॉलनी,अंजनेयनगर भागातील स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असलेल्या विविध विकास कामांची पहाणी केली. उत्तर भागातील या उपनगरात सुरू असलेली कामांची पहाणी करताना त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
अशोक सर्कल ते रेल्वे स्थानक नवीन रस्त्याचे काम सुरू झाले असून आगामी दोन दिवसात ए पी एम सी रस्त्याचे देखील काम सुरू होईल जेणे करून पुढील दोन वर्षात शहरातील रस्ते गुळगुळीत होतील स्मार्ट सिटीचे काम देखील दिसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.विकास कामे करताना जनतेला थोडा त्रास होईल तो सहन करून शासनाला जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केलं.
स्मार्ट सिटीच्या कामात अनेक अडथळे आल्याने गेल्या चार वर्षा पासून ही योजना सुरू असली तरी म्हणावे तेवढे काम दिसत नाही उलट स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड गैरकारभाराने चर्चेत राहिली आहे. उत्तर आमदारांनी उपनगरातील या विकास कामांची पहाणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आता तरी शहर स्मार्ट होईल का?हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.