जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, दुर्गा माता की,चा अखंड जय घोष करीत शहरातल्या ताशीलदार गल्ली सह मध्यवर्ती भागात दौड संपन्न झाली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड च्या माध्यमातून मराठी अस्मितेचे दर्शन घडते आहे सर्वत्र भागवेमय वातावरण पाहायला मिळत आहे.
दर वर्षी ताशीलदार गल्ली विभागाच्या वतीने स्वराजा साठी रक्त सांडलेल्या मावळ्यांच्या वंशजांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात येतो यंदा च्या वर्षी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या “दुधाई” धाराऊ गाडे पाटील संभाजी महाराजांच्या जन्म नंतर महाराणी सई बाईसाहेब या अशक्त झाल्या होत्या छत्रपती संभाजी राजांना दुधाची नितांत गरज होती म्हणून राजमाता जिजाऊ मा साहेबांनी किल्ले पुरंदर येथून जवळच असलेल्या कापुरवळ येथील गाडे पाटील यांची सून धाराऊ गाडे पाटील त्यांना बोलावून घेतलं व त्यांना छत्रपती संभाजी राजांना दुध पाजण्याचे नियुक्ती केली अशा या मातेच्या दुधावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे घडले त्या धारा गाड्यांचे तेरावे वंशज अमित शिवाजी गाडे पाटील व हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजी मोहिते याना आमंत्रित केले होते.
प्रारंभी ताशीलदार गल्लीतील सोमनाथ मंदिर येथे आरती करून दौडीस प्रारंभ करण्यात आला .शिवकाळातील मावळ्यांच्या वंशजांच्या उपस्थितीत ने दौडीत सहभागी झालेल्या शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता कपिलेश्वर उड्डाण पूल वरून दौड शनी मंदिर येथे पोहोचली शिवप्रतिष्ठान च्या वतीने वंशजांचा सन्मान करण्यात आला आरती करून ध्येय मंत्र सांगून अमित गाडे पाटील, जयाजी मोहिते, उद्योजक प्रकाश चौगुले यांच्या हस्ते ध्वज उतरून दौडी ची सांगता करण्यात आली.
उद्याची दौड(मंगळवारीची दौड)
मारुती मंदिर मारुती गल्ली ते धर्मवीर संभाजी चौक.