स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली.
छावणी प्रदेशात काम सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्या मार्फत छावणी परिषदेला फॉर्म भरून पाठवून परवानगी घेणे आवश्यक आहे.पूर्वपरवानगी घेण्या अगोदर छावणी प्रदेशात काम सुरू करू नये अशी सूचना मंत्री सुरेश अंगडी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
स्मार्ट सिटी योजनेतील कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.कोणत्याही तांत्रिक कारणामुळे काम अडवून ठेवू नये.पाणी पुरवठा महामंडळ,हॅस्कोम, महानगरपालिका आणि अन्य खात्यानी एकमेकांशी समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे असेही अंगडी यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेत अधिक निधी मिळण्यासाठी संबंधित खात्यानी प्रस्ताव तयार करून पाठवून द्यावेत अशी सूचना स्मार्ट सिटी योजनेतील अधिकाऱ्यांना बैठकीत केली.बैठकीला जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी, ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.