राज्योसव दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. या बैठकीत जे कुणी काळा दिन पाळतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी काही कन्नड संघटनांनी बैठकीत केली. या मागणीमुळे कन्नड संघटनांचा पुन्हा थयथयाट सुरू झाला असून त्याला आवर करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मराठी बहुलभाषिक असलेला सीमाभाग अन्याने कर्नाटकात टाकण्यात आला आहे. तेव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी जनता 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून दरवर्षी पाळत आली आहे. काही कन्नड संघटनांचे बोटावर मोजण्याइतके गुंड मनमानी कारभार करू लागले आहेत. सरकारी निधीवर राज्योसव साजरा करणाऱ्यांनी आता मराठी जनतेकडे ही बोट दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे बोट वेळी तोडणे गरजेचे, असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत राज्योसव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी सुरू केली जाते. मात्र याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष करून आणि पत्रकारांना न घेता बैठक घेतली. राज्योसव साजरा करण्यापेक्षा मराठी जनतेला कसे डिवाचावे याचा अनुभव या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्योत्सव साजरा करण्यासाठी दोन वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारीही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून मराठी जनतेवर अन्याय करण्याबाबत अधिक चर्चा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.