मराठा मंडळ हलगेकर डेंटल कॉलेजने अनेक समस्यांवर मात करून रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे.व्यवस्थापन,प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मोठे योगदान रौप्य महोत्सवी वाटचालीत आहे ,असे उदगार पद्मभूषण अनिल कोहली यांनी काढले.
हलगेकर डेंटल कॉलेजच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.डेंटल कॉलेजच्या आवारात झालेल्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला पद्मभूषण अनिल कोहली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रौप्य महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी,मेडीसीनल गार्डन, औषधी मूल्यमापन विभागाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू,पद्मश्री महेश वर्मा,किंगशुक पोद्दार,प्राचार्य रमाकांत नायक,नागराज यादव आणि रौप्य महोत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ.मधु पुजार उपस्थित होत्या.
मराठा मंडळाने उभारलेली प्रयोगशाळा ही केवळ डेंटल नव्हे तर अन्य क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे असे आपल्या भाषणात अनिल कोहली म्हणाले.
प्राचार्य डॉ. रमाकांत नायक आणि डॉ.किशोर भट यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला अनेक मान्यवर,सदस्य,हितचिंतक आणि विद्यार्थी उपस्थित होते.