केएएस अधिकारी शशिधर कुरेर यांनी आज पुन्हा बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार स्वीकारला आहे, 20 सप्टेंबर रोजी त्यांची या पदासाठी नियुक्ती झाली होती मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता आज त्यांनी अधिकृतपणे हा पदभार स्वीकारला असून या पदावर असलेले शिरीन नदाफ यांची बदली झाली आहे.
बेळगाव शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे स्मार्ट सिटी लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर बदलल्यामुळे पदभार त्यांच्याकडे होता सध्या स्मार्ट सिटी लिमिटेड कामाचा नियोजनाचा बोजवारा उडाला आहे .
एकापेक्षा अधिक अधिकारी कमी वेळेत बदल्या असे प्रकार घडले आहेत आता शशिधर कुरेर यांना या पदावर आणखी किती दिवस ठेवले जाणार की लगेच बदलणार याच्यावरून काम कसे होणार हे ठरेल